यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.५ ऑगस्ट २४ सोमवार
येथील माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षरोपण कार्यक्रमाचे पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थित नुकताच घेण्यात आला.
प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष व यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक तसेच खरेदी विक्री संघाचे संचालक उमेश रेवा फेगडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने यावल खरेदी विक्री सहकारी सोसायटीच्या परिसरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन पर्यावरण व संवर्धनाचा संदेश देण्यासाठी संपुर्ण देशात साकारण्यात येत असलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या कार्यक्रमाअंतर्गत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.येथील खरेदी विक्री संघाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या स्वागत सत्काराच्या कार्यक्रमा प्रसंगी उमेश फेगडे यांचा विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, भारतीय जनता पक्ष सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे,समाजसेवी संस्था आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे,यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन तेजस पाटील,योगेश चौधरी,बबलु घारू,भुषण फेगडे,खरेदी विक्री संघाचे संचालक अतुल भालेराव,भाजयुवा मोर्चाचे सागर कोळी,भाजपा शहराध्यक्ष राहुल बारी,भाजपाचे जेष्ठ कार्यकर्त किशोर कुलकर्णी,अनिल डांबरे,कोमल इंगळे,व्यकंटेश बारी,पुंडलीक बारी,पी.एस.सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.