यावल येथे डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवारातर्फे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना मोफत ऑनलाईन शिबिराचे आयोजन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.५ ऑगस्ट २४ सोमवार
येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या वतीने महाराष्ट्र शासनाची राज्यातील गरजु महिलांना आर्थिकदृष्टया स्वालंबी व आत्मनिर्भर करणारी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना असुन या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमाह १५०० रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.सदरील योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता आज दि.५ ऑगस्ट आणि दि.९ ऑगस्ट या दोन दिवसांकरिता मोफत नांव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या वतीने राज्यातील महिलांसाठी महत्वकांशी अशी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू करण्यात आली असुन या योजने अंतर्गत राज्यातील सुमारे १ कोटीच्या वर असलेल्या लाडक्या बहीणींना या योजनेचा लाभ मिळणार असुन दि.३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहे.दरम्यान सदरचे अर्ज भरण्यासाठी महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने यावल येथील डॉ.कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवाराच्या वतीने आज दि.५ ऑगस्ट सोमवार व ९ ऑगस्ट शुक्रवार या दोन दिवस ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना मोफत अर्ज भरण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी महिलांनी १५ वर्षापुर्वीचे लाभार्थीचे नाव असलेले रेशनकार्ड,मतदार कार्ड किंवा जन्माचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला या कागदपत्रांसह आज दि.५ ऑगस्ट आणी दि.९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत यावल येथील डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांचे संपर्क कार्यालय,आई हॉस्पीटलच्या शेजारी,भुसावळ रोड यावल या ठीकाणी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.