सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ ऑगस्ट २४ बुधवार
गावातील लक्ष्मी देवीच्या उत्सवात वाद्यांच्या तालावर पत्नीला खांंद्यावर उचलून घेत नाचल्याचा राग मनात धरून भावजयीने दिराच्या पोटात चाकूने भोसकून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी गावात नुकतीच घडली असून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.धनराज हिरा काळे वय ३० असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी त्याची भावजय आशा ऐजिनाथ काळे वय ३३ हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत धनराजची पत्नी संगीता धनराज काळे वय २७ हिने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.