यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि .७ ऑगस्ट २४ बुधवार
धुळे येथे राहणाऱ्या एका प्रवाशी महीलेचे नुकतेच एक लाख रुपये किमतीचे मंगळसुत्र चोरीच्या घटनेमुळे यावल बस स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली असुन यावल बसस्थानकावर मागील अनेक दिवसांपासुन वारंवार होणाऱ्या प्रवाशाच्या महागडया वस्तुच्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असुन या पार्श्वभुमिवर विभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांनी यावल येथे बसस्थानकावर नुकतीच भेट देवुन प्रवासी सुरक्षेची पाहणी करीत काही महत्वाच्या सुचना यावल एस टी आगार प्रमुख दिलीप महाजन यांना दिल्या.दरम्यान सदरील प्रकाराबाबत पोलीस प्रशासन एक्शन मोडवर आल्याने चोरट्यांचे व रोड रोमियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
यावल बस स्थानकावर मागील दोन वर्षापासुन प्रवाशांचे सोन्याचे दागिने,महागड्या वस्तु व पैसे चोरी जाण्याच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर तसेच टवाळखोरांकडून विद्यार्थी तरुणींची होणारी छेडखानी वरून होणाऱ्या गंभीर घटना याशिवाय प्रवाशा संदर्भातील आदि विषयाला गांभीर्याने घेत फैजपुर विभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांनी नुकतीच बस स्थानकावर भेट देवुन प्रवाशी सुरक्षा संदर्भातील व्यवस्थेचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी आगार व्यवस्थापनाला बसस्थानकाच्या काही महत्वाच्या ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्या संदर्भात सुचना दिल्या. प्रसंगी आगार व्यवस्थापनाकडून वारंवार पोलीस प्रशासनाकडे मागणी करून देखील बसस्थानकावर अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त असावा अशी मागणी करण्यात आली असुन या मागणीकडे आगार व्यवस्थापनाने विभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांचे लक्ष वेधले यावेळी सिंग यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आलेत.याप्रसंगी यावल पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्यासह पोलीस कर्मचारी व यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन,आगार वाहतुक लिपीक संदीप पाटील,लिपिक अतुल चौधरी,वरिष्ठ लिपिक महेन्द्र पाटील आदी उपस्थित होते.