यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ ऑगस्ट २४ गुरुवार
येथे नियमीत भरणारा शुक्रवारच्या दिवशीचा आठवडे बाजार हा दि.९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे कार्यक्रमामुळे दि.१० ऑगस्ट शनिवार रोजी भरणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावल नगरपरिषद व प्रशासनास आदेश दिले आहे.
यावल येथे जिल्ह्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय असुन या कार्यालयास लागुन असलेल्या जागेवर यावल येथे शुक्रवारच्या दिवशी नियमित बाजार भरतो.या बाजारात जिल्ह्यातुन मोठया संख्येत विविध जिवनाश्यक वस्तुंची विक्री करण्यासाठी व्यापारी व शेतकरी येत असतात.दरम्यान उद्या दि.९ ऑगस्ट शुक्रवारचा दिवस असुन आदिवासी बांधवांचे जागतीक आदिवासी दिवस असल्याने यावलच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन कार्यालय परिसरात दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमस्थळी होणारी गर्दी व आठवडे बाजाराची नागरीकांची गर्दी हे बघता प्रशासन व पोलीस यंत्रणेवर ताण निर्माण होईल.परिणामी कायदा सुव्यस्थेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुंबई मार्केट अॅण्ड फेअर्स अॅक्ट १८६२ चे कलम ५ ( अ ) व (क ) अन्वये येथे भरणारा आवठवडे बाजार हा एक दिवसाकरिता दि.९ ऑगस्ट ऐवजी दि.१० ऑगस्ट शनिवार रोजी नियमित ठीकाणावर भरणार आहे.जळगाव जिल्ह्यासह यावल,चोपडा,रावेर या परिसरातील व्यापारी व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.