यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ ऑगस्ट २४ गुरुवार
फैजपुर विभागीय प्रांताधिकारी म्हणुन बबनराव काकडे यांनी पदाची नुकतीच सुत्रे सांभाळली असुन त्यानिमित्ताने यावल येथील भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडी जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन फेगडे यांनी कार्यालयात भेट घेवुन त्यांचे स्वागत केले आहे.
येथील फैजपुर विभागाच्या प्रांताधिकारी म्हणुन कार्यरत असलेल्या प्रशिणार्थी प्रांत अधिकारी देवयानी यादव यांची उतरप्रदेश येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या प्रांत अधिकारी पदावर बबनराव काकडे यांची नुकतीच नेमणुक करण्यात आली आहे.दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन फेगडे यांनी फैजपुर येथे रूजु झालेले नुतन प्रांत अधिकारी बबनराव काकडे यांची भेट घेवुन त्यांचे स्वागत केले आहे.एक चांगले व कार्यतत्पर अधिकारी म्हणुन ओळख असलेले प्रांत अधिकारी बबनराव काकडे यांच्याकडून गेल्या अनेक दिवसांपासुन नागरीकांचे विद्यार्थ्यांचे तसेच शेतकऱ्यांचे प्रलंबित कामे व विविध दाखले व आदी कामांना आता गती मिळेल अशी अपेक्षा डॉ.कुंदन फेगडे यांनी सदर भेटी दरम्यान व्यक्त केली आहे.