यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ ऑगस्ट २४ गुरुवार
तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत गेल्या दोन दिवसापुर्वी फुलसिंग पहाडसिंग बारेला (वय ९ वर्ष) राहणार विटवे पाडा हिंगोणा तालुका यावल गावातील विद्यार्थ्याला मनवेल शाळेत चक्कर येवुन पडल्याने विद्यार्थ्याचा दुदैवी मृत्यु झाला होता.
या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा ही अलर्ट झाली असुन आज दि.८ ऑगस्ट गुरुवार रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन वायकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी व साकळी प्राथमिक केन्द्राच्या आरोग्य अधिकारी स्वाती कवडीवाले,वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिष चौधरी,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.अरूण पाटील यांच्या पथकाने मनवेलच्या आश्रमशाळेला भेट देवुन शाळेतील विद्यार्थ्यांच्या नियमित होणाऱ्या आरोग्य तपासणीसह स्वच्छता संदर्भात आढावा घेतला तसेच शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यासंदर्भात काही महत्वाच्या सुचना देत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणेबाबत आरोग्य यंत्रणेला सुचित केल्याची माहीती यावेळी पत्रकारांशी बोलतांना डॉ.सचिन वायकर यांनी दिली आहे.