Just another WordPress site

यावल शहर व परीसरात रानमेवा फळभाजी कांटूर्लेला मोठी मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ ऑगस्ट २४ सोमवार

येथील बाजारात काही मोजक्याच ठीकाणी विक्रीला येत असलेले कंटुर्ले हे मानवी आरोग्यासाठी लाभदायी व शक्तीशाली फळभाजीला असून  या फळभाजीला बाजारात मोठी मागणी असल्याने विक्री करणारे फार भाव खात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कांटोला किंवा कटूर्ल नावाने ओळखली जाणारी ही सर्वात शक्तीशाली फळभाजी असुन कांटोला हे अगदी कारल्यासारखे दिसते व या फळभाजीमध्ये भरपूर व्हीटॅमीन सी असते म्हणून या फळभाजीला सर्वात्तम भाजी म्हणतात.या फळभाजीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळया नावाने ओळखले जाते.जेवणात अत्यंत चविष्ठ लागणारी भाजी आहे.गुणकारी अशी ही फळभाजी मानवी आरोग्यावरील १० रोगांवर उपचार करण्याची क्षमता असुन यात आरोग्य खनिज देखील आहे.सदरहू लठ्ठपणापासुन ते मधुमेह सह बिपी नियंत्रण,कॅन्सर,फ्यु या सारख्या मोठया आजारांवर ही फळभाजी रामबाण उपाय आहे.या फळभाजीला काही मंडळी व्हॅज चिकन देखील म्हणतात.आपण ज्या ज्या पद्धतीने बनवतात त्यात या भाजीची चव ही वाढते.या फळभाजीची लागवड डोंगराळ भागात जास्त होते म्हणुन तिला डोंगराळ भाजी म्हणुनही बोलले जाते. आपल्या शरीरातील डोकेदुखी मुळव्याध,बुद्धकोष्ठा,कॅन्सर व ज्यांना मलावरोधाचा त्रास असेल त्यांनी रोज ही भाजी खाणे अत्यंत फायदेशीर असुन या फळभाजीने रोगप्रतिकारशक्ती देखील सुधारली जाते.सद्या ही भाजी यावल शहरात काही मोजक्याच ठिकाणी विक्रीला येत असुन नागरीकांमध्ये या भाजीला मोठी मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.