आपले पुढील पाऊल महिलांच्या सशक्तिकरणासाठी व त्यांचा सन्मान राखण्यासाठी राहणार-डॉ.कुंदन फेगडे यांचे प्रतिपादन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ ऑगस्ट २४ बुधवार
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील प्रसिद्ध डॉक्टर आणि समाजसेवक तथा भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांच्या वतीने राखी पौर्णिमा (रक्षाबंधन) सणाचे औचित्य साधून फैजपूर येथे भव्य महिला भगीनींसाठी स्नेहसंमेलनाच्या भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या विशेष कार्यक्रमात रावेर व यावल या क्षेत्रातील शेकडो महिलांनी भगीनीनि आपला सहभाग नोंदविला.या कार्यक्रमात प्रमुख आकर्षणाचे केन्द्र ठरले ते स्वामी सोपान कानेरकर त्यांचे प्रेरणादायी प्रवचन.ज्यामध्ये त्यांनी महिलांच्या सन्मानाचे आणि समाजातील त्यांच्या महत्त्वाचे स्थान अधोरेखित केले.
याप्रसंगी डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी महिलांसोबत रक्षाबंधन साजरा केला आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढील पाऊल उचलण्याचे वचन दिले तसेच समाजात महिलांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असून त्यांच्या सन्मानासाठी आणि विकासासाठी विविध योजना राबवण्याचे आश्वासन याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना दिले.फैजपुर येथील शुभदिव्य या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात रावेर यावल मतदारसंघातील शेकडो महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि डॉकुंदन फेगडे यांच्या माध्यमातुन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.यावेळी भाजपा पुर्व विभागाचे जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे,भाजपा जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रंजना पाटील,सविता भालेराव,यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील,प्रल्हाद महाजन, भाजपा यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी व उज्जैनसिंग राजपूत,यावल खरेदी विक्री संघ चेअरमन नरेंद्र नारखडे,सारिका चव्हाण,रेखा बोंडे,जयश्री चौधरी,वासुदेव नरवाडे,योगेश चौधरी आदी उपस्थित होते.