यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी)
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.११ मंगळवार रोजी बालउपक्रम संदर्भात प्रेरणा सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व ग्रा.पं.सदस्य डॉ.राजेंद्रकुमार झांबरे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन गटशिक्षणाधिकारी नईम शेख,विस्तार अधिकारी विश्वनाथ धनके,केंद्र प्रमुख महंमद तडवी,सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगाडे,अखिल भारतीय प्राथमिक संघटना तालुकाध्यक्ष श्रीकांत मोटे,अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटना सरचिटणीस सचिन धालपे,अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व जुनिअर कॉलेज मुख्याध्यापक नितीन झांबरे,ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी,दिलीप तायडे,आशा आढाळे,शकीला तडवी,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल चौधरी,आरोग्य सेविका लता सिस्टर,उपशिक्षक पी.पी.कुयटे,सचिन भंगाळे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिवाकर सरोदे यांची उपस्थिती राहिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी बालउपक्रमाचे महत्व व उद्देश्य याबाबत माहिती दिली.तसेच उपशिक्षक शेखर तडवी यांनी बालाउपक्रमाचा हेतू समजावून सांगितला त्याचबरोबर डीपीटीच्या माध्यमातून टीव्हीवर दाखविण्यात आलेल्या बालाउपक्रमाबाबत माहिती समजावून सांगितली.तर या प्रेरणा सभेला केंद्र प्रमुख महंमद तडवी,विस्तार अधिकारी विश्वनाथ धनके,गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी शासनाच्या बालाउपक्रमाविषयीचे धोरण याच बरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्याकरिता व शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी पालकांचा व गावकऱ्यांचा सहभाग व सहकार्य करण्याबाबत आवाहन केले.तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे व सदस्य अनिल पाटील यांनी शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेबाबत गटशिक्षणाधिकारी नईम शेख व विस्तार अधिकारी विश्वनाथ धनके यांच्याकडे तसेच शाळेच्या वॉलकंपाउंड बाबत ग्रामपंचायतीकडे समस्या मांडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल भारतीय प्राथमिक संघटना तालुकाध्यक्ष श्रीकांत मोटे यांनी केले तर आभार उपशिक्षक शेखर तडवी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेकरीता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे,उपाध्यक्षा धनश्री धनगर,सदस्य दिलीप तायडे,अनिल पाटील,महंमद तडवी,सुरेश झांबरे,रशिदा तडवी,नयना राणे,मुख्याध्यापिका विजया पाटील,उपशिक्षक शेखर तडवी,सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिवाकर सरोदे यांनी परिश्रम घेतले.तर यावेळी राहुल आढाळे,डिगंबर खडसे,जुम्मा तडवी यांच्यासह अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर,ग्रामस्थ,पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अनेक दात्यांनी सढळ हाताने आपापल्या परीने बालउपक्रमाकरिता योगदान जाहीर केले.