यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑगस्ट २४ गुरुवार
येथे संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज यांचे भव्य जाहीर व्याख्यान काल बुधवार रोजी यावल येथील प्रसिद्ध महर्षी व्यास मंदिर सभागृहात उत्साहात पार पडले.यावल येथील युवा समाजसेवक डॉ.कुंदन सुधाकर फेगडे अध्यक्ष आश्रय फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमास परिसरातील नागरीकांचा व महिला भागिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला.भक्तीमय वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास तालुक्यातील भक्त आणि संत साहित्याच्या प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.दरम्यान शिरीष महाराजांनी आपल्या प्रवचनांमध्ये संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा आणि अध्यात्मिक वारशाचा अतिश्य मोलाचा संदेश दिला.समाज प्रबोधन आणि अध्यात्मिक जागृती या मुद्द्यांवरील प्रवचनातुन त्यांनी विशेष भर दिला.
दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन काल दि.२१ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता झाले आणि श्रोत्यांनी उत्साहाने महाराजांचे विचार आत्मसात केले.या कार्यक्रमाला यावल परिसरातील मान्यवर व्यक्ती,सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होते.आयोजकांच्या वतीने डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार होतो असे सांगितले.यावेळीयेथील समाजसेवेत व सामाजिक उपक्रमात रावेर विधानसभा क्षेत्रात अग्रेसर असलेली समाजसेवी संस्था आश्रय फाऊंडेशन यावलचे अध्यश तथा जळगांव जिल्हा भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हा सरचिटणीस डॉ कुंदन फेगडे यांच्या प्रयत्नानी विजय महाराज संचित महाराज,भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,हेमराज फेगडे,संजय फिरके,डॉ.जागृती फेगडे,सौ प्राची पाठक,भूषण फेगडे,रितेश बारी,उज्वल कानडे,सचिन कोळी,कोमल इंगळे,सागर इंगळे,विनीत सोनवणे,मनोज बारी,धनराज कोळी,सागर लोहार यांच्यासह परिसरातील वारकरी मंडळ,भजनी मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते.