मुंबई – पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ ऑगस्ट २४ शनिवार
बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार १३ ऑगस्टला घडला व या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली.याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले होते.या विशेष तपास समितीने (SIT) बदलापूरच्या शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे असून Pocso Act च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य केले.दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये २० ऑगस्टच्या दिवशी पाहण्यास मिळाला. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे ९ तास लोकल सेवा ठप्प केली होती.आता या प्रकरणी एसआयटीने शाळेवर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे.शाळेतली विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शाळेची जबाबदारी नाही का ? या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घ्यायला इतका वेळ का लावला हे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले आहेत.आता एसआयटीने शाळेवर गुन्हा दाखल केला आहे.
एसआयटीने म्हटले आहे की शाळा प्रशासनाने या प्रकरणाची माहिती मिळूनही पोलीस तक्रार केली नाही.पीडित मुलीच्या पालकांनी शाळेशी संपर्क केला होता तरीही शाळेने योग्य पावले उचलली नाहीत.एसआयडीने पॉक्सो कायद्याच्या २१ व्या सूचीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये लहान मुलाविरोधातला गुन्हा ठाऊक झाल्यानंतर त्यासंदर्भात कुणीही तक्रार करु शकते व ती न केल्यास या सूची अंतर्गत गुन्हा दाखल होतो.या प्रकरणात शाळेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत बदलापूरकरांनी कारवाईची मागणी केली होती तसेच स्थानिक नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही मागणी केली होती.ज्यानंतर आता एसआयटीने हे पाऊल उचलले आहे.टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.शाळा प्रशासनाने आम्ही दाखवलेला अहवाल फेटाळला त्यानंतर आम्ही तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो तिथे आमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही.तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी १२ तास लावले.बदलापूर प्रकरणात मनसे नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला.पोलिसांनी आपल्या वक्तव्यात अनेक बदल केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावून कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये असा इशारा दिल्याचाही पालकांचा आरोप आहे.