सप्टेंबर महिन्यात मिळणार तीन महिन्यांचे पैसे 

आपल्या बहि‍णींचे इतके निखळ प्रेम मिळते तर त्यांच्या पाठीशी उभे राहता येईल असे काहीतरी करायला पाहिजे.तुम्ही म्हणता ना की १० टक्के लोकांनाही फायदा मिळणार नाही आणि आता दीड कोटी बहि‍णींना याचा पैसा जातोय.तीन हजार रुपये सव्वाकोटी खात्यात गेले आहेत उर्वरित खात्यातही पैसे जायला सुरुवात झाली आहे.कोणाचा फॉर्म उशिरा आला तरी चिंता करू नका कारण ३१ ऑगस्टपर्यंत भरलेल्या सर्व अर्ज धारकांना सप्टेंबर महिन्यात जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत.कोणाही बहिणीला वंचित ठेवणार नाही असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.सप्टेंबरमध्येही फॉर्म घेऊ,जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही.पण काही लोक योजना बंद करण्याच्या मागे लागले आहेत.काही लोक हायकोर्टापर्यंत गेलेत.हायकोर्टाने चपराक केली ते थांबवू शकले नाही.मग रोज नवनवीन गोष्टी बोलतात.योजना बंद करण्याचा प्रयत्न करतात अशी टीकाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.