मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा)
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिल्यांनतर आता शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.नव्या चिन्हासाठी शिंदे गटाने यापूर्वी दिलेले पर्याय निवडणूक आयोगाने नाकारत त्यांना नवीन चिन्हे पाठवण्याचे निर्देश दिले होते.त्यानंतर शिंदे गटाने सादर केलेल्या चिन्हांपैकी निवडणूक आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह त्यांना दिले आहे.शिंदे गटाने यापूर्वी उगवता सूर्य,त्रिशूळ आणि गदा हि ३ चिन्हे दिले होती.मात्र यातील गदा आणि त्रिशूल हि धार्मिक चिन्हे असल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने हि चिन्हे नाकारली होती.त्यांनतर आज सकाळपर्यँत नवीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश आयोगाने शिंदे गटाला दिले होते.त्यानुसार शिंदे गटाने आज सकाळी निवडणूक आयोगाला तळपता सुर्य,ढाल तलवार,पिंपळाचं झाड ही चिन्ह दिली होती.त्यातील ढाल तलवार हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे.
दरम्यान नावाबाबत बोलायचे झाल्यास शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे तर उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे तसेच मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळाले आहे.