मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार
डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या डोंगर कठोरा या खेडेगावातील रहिवाशी व महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आपल्या गायनातून आपला वेगळा ठसा उमटवून नावलौकिक मिळविलेले डिगंबर सिताराम तायडे व त्यांच्या पत्नी शकुंतला डिगंबर तायडे या दाम्पत्याला दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया भवनात दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रमेश कुमार आणि मुख्य सचीव तसेच परराष्ट्र मंत्रालयाचे सचीव,नीती आयोगाचे अध्यक्ष,जी-२ चे अध्यक्ष,महात्मा गांधी ईन्टरनॅशनल युनीव्हर्सीटीचे संचालक व इतर नामांकीत मान्यवरांच्या हस्ते डिगंबर तायडे यांना इंजीनिअरिंग कॅटॅगीरी व लाईफ टाईम ॲचीव्हमेंनटसाठी तसेच शकुंतला तायडे यांना समाज कार्य व स्वयंरोजगारमध्ये निपुण कामगिरी केल्याबद्दल या दाम्पत्याला “नेल्सन मंडेला फेलोशिप ॲवार्ड २०२४ ” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.एका छोट्याशा खेडेगावातून आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी वाढवीत उतुंग भरारी घेतल्याबद्दल त्यांचे आप्तस्वकीय,मित्रमंडळी तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेछयांचा वर्षाव होत आहे.
सदरील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रमेश कुमार,श्रेयांस मेहता IES (CPWD),राजेंद्र मुनोत गुन्हे विरोधी प्रमुख,सानिपिना जयलक्ष्मी राव समाजसेवक, डॉ.थेजो कुमारी अमुदला सामाजिक कार्यकर्ता,शशी कुमार महासचिव आंतरराष्ट्रीय संबंध विभाग,इंटरनॅशनल ह्युमन राइट्स डिफेंडर्स फाउंडेशन,डी.एस.मौर्यकारागृह उपअधीक्षक नवी दिल्ली,प्रदीप शोरमा हिंदुस्तान इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आयोजक,नरेंद्र कुमार स्काय न्यूज चे मुख्य संपादक,अरविंद अरोरा अभिनेता आदी मान्यवर उपस्थित होते.