Just another WordPress site

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांची फोडण्यात आली दहीहंडी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार

येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरील भुसावळ टी पॉइंट येथे “महायुती सरकारचे काळे कारनामे” हा कार्यक्रम घेण्यात आला.वाढत्या महागाईमुळे प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडले असून महाराष्ट्र अस्मितेवरचा घाव,वाढती गुंडगिरी व गुन्हेगारी वाढता महिला अत्याचार,वाढता भ्रष्टाचार,पेपर फुटीमुळे ढासळलेल्या शैक्षणिक अवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान,सुशिक्षित बेकारी व बेरोजगाराची उद्भवलेली समस्या या सगळ्या गोष्टी महायुतीकडून करण्यात आल्या आहेत.यात स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या नतदृष्ट सरकारने केवळ समजा-समाजात भांडण लावण्याचे काम केले असून महायुती सरकारच्या या काळ्या कारनाम्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज दि.२७ मंगळवार रोजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात घोषणा देऊन महायुती सरकारचे काळे कारनाम्यांची दहीहंडी फोडण्यात आली व “महायुती काळे कारणामे” याचे बारा पानांचे पेपर प्रसिद्ध करण्यात येऊन जनसामान्य जनतेस वाचनासाठी वाटप करण्यात आले.

सदरील कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले,माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,विजय पाटील,एम.बी.तडवी,भैय्या नरेंद्र पाटील,पवन पाटील, अॅड कोमलसिंग पाटील,ललित पाटील,बापू जासूद,नानाजी प्रेमचंद पाटील,अरुण लोखंडे,कामराज घारू,आरिफ तडवी,मोहसीन खान, ललित तेली,पितांबर महाजन,ललित पाटील खेडी,किशोर माळी,प्रसन्न पाटील,अय्याज मण्यार,जाहीद कुरेशी,जुनेद शेख,शेख इरफान,विजय साळी,गजानन पाटील,प्रकाश भोसले,यशवंत पाटील,आबिद मोमीन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.