यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार
परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले व हतनूर धरणाच्या पाण्यावर ८५ ग्रामपंचायती व भुसावळ,वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी,दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र तसेच जळगाव जिल्ह्यातील यावल,भुसावळ,चोपडा,अमळनेर नगरपालिका इ.साठी पाणीपुरवठा योजना अवलंबून असून हतनूर धरणावरील यावल शहरासाठीची योजना जुनी झाली आहे.पुढील ३० वर्षांची वाढती लोकसंख्या गृहीत धरून नविन पाणीपुरवठा योजना शहारापासुनजवळ असलेल्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पावरून व्हावी अशी आपली व शहरवासीयांची मागणी होती म्हणून आम्ही सहकारी नगरसेवक यांच्या सहकार्याने जुन २०२१ मध्ये रीतसर ठराव मंजुर करून नाशिक येथील निसर्ग कन्सल्टंट या कंपनीस परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे काम दिले होते.या योजनेच्या सुमारे ८२ कोटी रूपयाच्या अंदाजपत्रकात तांत्रिक मंजुरी घेण्यात आली असुन पाणी आरक्षण प्रस्तावास मान्यता आवश्यक होती.सदरहू २.८२ दश लक्ष घन मिटर इतके पाणी यावल शहरातील नागरिकांना पिण्यासाठी आरक्षित केल्यामुळे योजना कार्यान्वित झाल्यावर प्रती नागरिक १३५ लिटर याप्रमाणे पाणी उपलब्ध होणार आहे.या योजनेस अद्याप प्रशासकीय मंजुरी नसुन शासन स्तरावर प्रलंबित आहे.
सदर काम लवकर मार्गी लावण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,केंद्रीय राज्य मंत्री रक्षाताई खडसे,जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील असून त्यांचे अतुल पाटील यांनी आभार मानले असुन पाठपुरावा करणारे अभियंता सत्यम पाटील यांचे व मुख्याधिकारी यावल यांचे देखील आभार मानले आहे.