Just another WordPress site

यावल-भुसावळ व बुऱ्हाणपुर-अंकलेश्र्वर महामार्गावरील जिवघेणे खड्डेमय तात्काळ दुरूस्त करा !! अन्यथा मनसेचा आंदोलनाचा इशारा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार

शहराला लागून असलेल्या यावल-भुसावळ आणी बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर या राज्यमार्गावर ठीकठिकाणी पडलेल्या जिवघेण्या खडुयांमुळे सदरील महामार्गांची अत्यंत बिकट अवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची आठ दिवसात दुरूस्ती न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिला आहे.

शहराला लागुन असलेले व वाहनांची वर्दळ असलेले बुऱ्हाणपुर-अंकलेश्र्वर राष्ट्रीय राज्य मार्ग व यावल-भुसावळ या मार्गावरील रस्त्यावर ठिकठीकाणी अपघातास आमंत्रण देणारे जिवघेणे खड्डे निर्माण झाले असुन या खड्डयांना चुकवितांना वाहनधारकाचे अंदाज चुकल्यामुळे अनेक अपघात या मार्गावरील रस्त्यांवर होत आहे.तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने जनहिताचे विचार करीत तात्काळ या खड्डेमय रस्त्यांची दुरूस्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी केली आहे.  दरम्यान आठ दिवसात या खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मनसेच्या वतीने या खडुयात बसुन आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने पत्रकारांशी बोलतांना देण्यात आला आहे.याप्रसंगी मनसेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांच्यासोबत किशोर नन्नवरे,गौरव कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.