यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार
येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ व्दारे संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नुकताच दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शाळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शशिकांत फेगडे व मंगला फेगडे हे होते.सर्व प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण प्रतिमा पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.तद्नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.सदरील कार्यक्रमात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा अत्यंत सुंदर असा सजीव देखावा सादर करण्यात आला.दरम्यान शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या वेशभूषा साकार करून तसेच सांस्कृतिक व पारंपारिक नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.यात सर्वात शेवटी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा साळुंखे यांनी केले तर शिक्षिका तेजस्विनी वाणी यांनी सर्वांना दहीहंडीचे महत्त्व सांगून आभार व्यक्त केले.यावेळी प्रशांत फेगडे यांच्यासह सर्व शिक्षकांचे व कर्मचारी वर्गाचे या कार्यक्रमास उत्तम सहकार्य लाभले.