यात संभाजी पाटील,मेहेक परब हे पोलीस कर्मचारीही जखमी झाले त्याचबरोबर अनेक कार्यकर्तेही जखमी झाले त्यामुळे या राड्याप्रकरणी गर्दी,मारामारी,घोषणाबाजी,शासकीय कामात अडथळा,लोकसेवकांना त्यांच्या कामात धाक दाखवून परावृत्त करणे,दुखापत करणे,जिल्ह्यात सुरू असलेल्या मनाई आदेशाचा भंग करणे,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमानुसार दोन्ही गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस.खाडे हे अधिक तपास करत आहेत.