मुंबई – पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० ऑगस्ट २४ शुक्रवार
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप होत असून सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला होता व डिसेंबर २०२३ या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते यावरुन आता उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.काल उद्धव ठाकरेंनी गणेश उत्सव समन्वय समित्यांशी संवाद साधला.रंगशारदा या ठिकाणी एक भाषण केले त्यावेळी त्यांनी ही जोरदार टीका केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यानंतर सरकार म्हणते आहे नौदलाची जबाबदारी आहे.नौदल म्हणते आहे की आमची नाही PWD ची जबाबदारी आहे.मालवणमध्ये आदित्य वगैरे सगळे गेले होते ते काही राडा करायला गेले नव्हते.आमच्या छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ महिन्यात पडतोच कसा ? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
पूर्वी एक दादा कोंडकेंचा सिनेमा होता ‘बोट लावेन तिथे गुदगुल्या’ नाव घेतले तरीही आपल्याला हसायला येते.आता मोदींचा सिनेमा येतोय ‘हात लावेन तिथे सत्यानाश’.आपण क्रिकेटचा सामना हरला त्याचे कारणही मोदीच आहेत.हात लावेन तिथे सत्यानाश ही यांची गॅरंटी आहे.ये मेरी गॅरंटी आहे असे वर पुन्हा सांगतात.असल्या सडक्या गॅरंटी आपल्याला नको.एक कविता आहे बघा ‘सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो’.आपल्या राष्ट्रपतींचे नावही योगायोगाने द्रौपदी आहे.आम्हाला आता तुमच्याकडूनच अपेक्षा आहेत.पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत ज्यांना मणिपूरबद्दल बोलायला काळ गेला.आता ते बदलापूरबद्दल बोलतील की बंगालबद्दल ते बघावे लागेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.गणपती हे आपले प्रतीक आहे,तो विघ्नहर्ता आहे.तुमच्या रुपातून माझ्या भगिनीसाठी विघ्नहर्ता मदतीला धावून गेला पाहिजे.निधी मिळतो म्हणून तुमचा आत्मा विकू नका. गणपती बाप्पा पावतो म्हटले की मला काहीजण म्हणतात तुम्ही अंधश्रद्धा पाळता पण मला वाटते की गणपती पावतो.रक्तदान शिबीराच्या माध्यमातून आपला बाप्पा पावतो.मी श्रद्धा आणि अंधश्रद्धेत गफलत करत नाही.मी अंधश्रद्धाळू नाही.गणपती मंडळांनी चांगली कार्ये करत राहिली पाहिजे तुम्ही सगळे गणपतीचे दूत आहेत हे मी म्हटले तर काय चूक आहे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.