यावल तालुका महाराष्ट्र कामगार सेनेची कार्यकारणी जाहीर !! तालुकाध्यक्षपदी किसन तायडे तर उपाध्यक्षपदी अक्षय तायडे !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ सप्टेंबर २४ सोमवार
येथील पंचायत समिती आवारात महाराष्ट्र राज्य कामगार सेनेची नुकतीच बैठक संपन्न झाली.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना तालूका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.सदर कार्यकारणी अध्यक्षपदी किसन तायडे (कोरपावली) यांची तर उपाध्यक्षपदी निमगाव येथील अक्षय तायडे व सचिवपदी मनीष पाटील (चुंचाळे) तर कार्यध्यक्षपदी वासुदेव वारके (न्हावी) यांची निवड करण्यात आली आहे.
येथील पंचायत समिती आवारात महाराष्टू राज्य कामगार सेनेची बैठक कामगार सेनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष विजय रल यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सचिव राहुल महाले,जिल्हा कार्यध्यक्ष दिलीप पंडीत पाटील व महिला विभागाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष कविता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.यावेळी ग्रामीण क्षेत्रात ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी म्हणून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या अडचणी व समस्याबाबत विचार विनिमय करण्यात आले तसेच कर्मचारी यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कामगार सेना ही सदैव खंभीरपणे आपल्या पाठीशी राहणार असल्याचे आश्वासन जिल्हाअध्यक्ष विजय रल यांनी दिले.महाराष्ट्र राज्य पातळीवर कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कामगार सेनेची यावल तालुक्याचा नुतन कार्यकारणी यावेळी सर्वानुमते जाहीर करण्यात आली.कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे.यात तालुका अध्यक्षपदी किसन तायडे,उपाध्यक्षपदी अक्षय तायडे,सचिवपदी मनिष पाटील,कार्यध्यक्ष वासुदेव वारके,सहसचिव गणेश पाटील,कोषाध्यक्ष धनंजय पाटील,संघटक गणेश तायडे, तालुका कार्यकारणी सदस्य म्हणुन मधुकर शिंदे,स्वप्नील पाटील,मोहम्मद शफी,महिला सदस्य अनिता धंजे,संतोष सपकाळे,निलेश पाटील,विश्वास पाटील,अशोक पाटील,अनिल विसपुते यांचा समावेश करण्यात आला आहे.सदर बैठकीला यावल तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी म्हणुन कार्यरत असलेले कर्मचारी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.बैठकीचे सुत्रसंचालन वासुदेव वारके यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश पाटील यांनी मानले.