यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ सप्टेंबर २४ सोमवार
तालुक्यातील जवळच असलेल्या एका गावातील तरुणीची सोशल नेटवर्कवर उत्तर प्रदेशातील तरुणासोबत ओळख झाली असता या ओळखीचा गैरफायदा घेत सदर तरुणाने थेट उत्तर प्रदेशातून तरुणीचे यावल तालुक्यातील गाव गाठले.याठीकाणी तरूणाने व त्याच्यासोबत आलेल्या तिन तरूणांनी तरूणीच्या कटूंबाशी वाद घातल्याने अखेर त्यांच्याविरूध्द यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,यावल तालुक्यातील एका गावातील तरुणीची उत्तर प्रदेशच्या तरूणांनी तरूणी व तिच्या कुटुंबाशी वाद घातला ही बाब गावातील नागरीकांच्या निदर्शनास आल्याने गावातील नागरीकांनी त्या चौघांचा चांगलाच चोप देत समाचार घेतला.दरम्यान सोशल नेटवर्कच्या माध्यमातून गावातील एका तरुणीची ओळख उत्तर प्रदेशातील जौनपुर जिल्ह्यातील सहागंज तालुक्यातील जरनापुर टपरी येथील राहणाऱ्या शिवम रवींद्रकुमार आस्थाना वय २६ वर्ष या तरूणाशी झाली.सदरहू ओळखीनंतर ते सोशल नेटवर्क एकमेकांशी बोलू लागले आणि यातून दोघांमध्ये वाद झाला व या वादातून शिवम आस्थाना हा त्याचे तीन मित्र असे चार जण शनिवारी थेट त्या तरूणीच्या गावात जाऊन तरुणीच्या घरीच पोहोचले.सदरच्या या सोशल नेटवर्कवरून ओळख झालेल्या त्या तरुणाला पाहून तरुणी आवाकच झाली व या चौघांनी या तरुणीशी आणि तिच्या आईशी वाद घालायला सुरुवात केली.सदर अनोळखी मुले काय वाद घालत आहे हे पाहून गावातील नागरिकांची गर्दी जमली आणि त्यांनी या चौघांना चांगलाच चोप दिला व नंतर त्यांना यावल पोलीस ठाण्यात आणले.यावल पोलीस ठाण्यात तरुणीची आईने उत्तर प्रदेशातील तरुणाविरुद्ध तक्रार दिल्यानुसार त्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.