मोरे कॉम्प्युटर्सची यशोशिखरावर भरारी !! संचालक सतिष मोरे “एज्युकेशनल एक्सलन्स” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ ऑगस्ट २४ मंगळवार
येथील मोरे कॉम्प्युटर्सचे संचालक सतिष प्रभाकर मोरे यांना सन २०२४ चा उत्कृष्ठ संगणक शिक्षक म्हणुन महाराष्ट्र राज्यातुन सर्वाधिक विद्यार्थ्यांना संगणकीय प्रशिक्षण देण्यात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल “एज्युकेशन एक्सलन्स” या राष्ट्रीय पुरस्काराने नागपुर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थित नुकत्याच संपन्न झालेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांना संगणकीय क्षेत्राच्या कार्यात उत्कृष्ट असे मार्गदर्शन प्रशिक्षण करीत त्यांना प्रभावी मार्गदर्शन करणारे मोरे कॉम्प्यूटर्सचे संचालक सतिष प्रभाकर मोरे यांना नागपुर येथील तुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध सिने अभिनेत्री रितु शिवपुरी यांच्या हस्ते व एएलसिपीएच्या संचालिका कविता ताओरी,संचालक शरद ताओरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संगणकीय क्षेत्रात उल्लेखनिय असे कार्य केल्याबद्दल त्यांना आखिल भारतीय एज्युकेशनल २०२४ च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.नागपुर येथे संपन्न झालेल्या संगणकीय शिक्षक या राष्ट्रीय पुरस्काराच्या भव्य अशा कार्यक्रमात देशातील जम्मु-काश्मिर,राजस्थान,हरियाणा,पंजाब,मध्य प्रदेश,महाराष्ट्र,गुजरात,बिहार,उत्तर प्रदेश,कर्नाटक,आंध्रप्रदेश सह २५ राज्यातील संगणकीय शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.एका मध्यवर्गीय कुटुंबातुन शिक्षण घेत कठोर परिश्रमातुन आपले संगणकीय शिक्षण पुर्ण करणारे सतिष प्रभाकर मोरे संगणक शिक्षक यांना उत्कृष्ठ संगणकीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.