यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ सप्टेंबर २४ शनिवार
मानवाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही यासाठी स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी शिक्षणाची दालने उभे केले व ती परंपरा कायम ठेवत आमदार शिरीष चौधरी यांनी शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे या दृष्टिने आज १९२२ साली स्थापन झालेल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटी भालोद ही संस्था स्वर्गीय तोताराम चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केली.शतकाची वाटचाल असणाऱ्या संस्थेची खूप मोठी प्रगती झाली असून अनेक विद्यार्थी या संस्थेने घडविले आहेत.या संस्थेचे योगदान लक्षात घेऊन शिक्षक दिनानिमित्ताने मधूस्नेह शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने ५सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल भालोद येथे यशवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून समाज घडविण्याचे काम करत असणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे व आपले कर्तव्य समजून शिक्षकांचा सन्मान यानिमित्ताने करण्यात आला.यावेळी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी भालोद संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जगन्नाथ चौधरी, उपाध्यक्ष अनिल सुधाकर चौधरी,चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी,व्हा.चेअरमन मोहन वासुदेव चौधरी,संचालक नितीन वासुदेव चौधरी, लिलाधर नारायण चौधरी,किशोर लक्ष्मण महाजन,मधुकर गिरधर परतणे,बापू पाटील,गोटू नेमाडे,प्रभात चौधरी,व्ही.आर.पाटील,ज्ञानेश्वर बढे, प्राचार्य,के.जी.कोल्हे,मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी,प्राथमिक मुख्याध्यापिका निलवंती बोरोले व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
यावल जे टी महाजन इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षक दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांनी केलेले विविध कार्यक्रमांचे सादरीकरण
येथील व्यास शिक्षण मंडळव्दारे संचलित जे.टी महाजन इंग्लिश स्कुल येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्या रंजना महाजन व ज्ञानेशश्वर मावळे उपस्थित होते.सर्वप्रथम सरस्वती मातचे पूजन व सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थानी भाषण देवून आपले मनोगत व्यक्त केले तसेच विदयार्थीनींनी नृत्य सादर केले.प्रसंगी शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन १० वीच्या विदयार्थीनी भुमिका अढायगे व देवयानी करनकर यानी केले तर आभार प्रदर्शनाचे ८ वीचा विद्यार्थी अनस खान याने केले.तसेच यावेळी शिक्षकांसाठी संगीतखुर्ची कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिक्षक दिनानिमित्ताने आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचा काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग
शासनमान्य आदिवासी विभाग कर्मचारी संघटना (शासकीय आश्रम शाळा) यावलचे प्रकल्प अध्यक्ष प्रशांत बोदवडे यांनी दिलेल्या माहिती नुसार १७ शासकिय शाळा व ३३ अनुदानित शाळा आणि ३ कार्यशाळा याठिकाणी आश्रमशाळेच्या वेळेत बदल करून ११ ते ५ करणे व सरसकट जुनी पेंशन योजना लागू करणे यासाठी जिल्ह्यातील विविध आश्रमशाळेत शिक्षकांनी काळया फीती लावून शासनाचा निषेध करण्यात आला.
जळगाव येथे आयोजित प्रशिक्षण स्थळी पी.बी.बोदवडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.तसेच अबॅकस कार्यशाळा सोनबर्डी येथे कार्यअध्यक्ष नितिन गवारे,उपाध्यक्ष श्रीमती पी.बी.पाटिल,श्रीमती कल्पना पाटिल,विष्णापुर आयोजित अबॅकस कार्यशाळा येथे संघटना उपाध्यक्ष एच.डी.पाटिल,दस्तगीर तड़वी यानी मार्गदर्शन केले.वैजापुर शाळा महिला अध्यक्ष शबाना तड़वी,पळसखेड़ा शाळा-दीपक लेंडाळे,मालोद उगले सर,कृष्णापूर,दीपक नांदुरे यांच्यासह संघटना सदस्य यांनी आंदोलन यशस्वीते सहकार्य केले.दरम्यान शाळा वेळत बदल न झाल्यास दि. २३ सप्टेंबर रोजी नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात येईल याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली.