Just another WordPress site

रावेर विधानसभा मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीबाबत डॉ.कुंदन फेगडे यांची ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याशी सकारात्मक चर्चा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१० सप्टेंबर २४ मंगळवार

येथील युवा नेते तथा भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडी जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन फेगडे यांनी नुकतीच राज्याचे ग्रामविकास,पंचायत राज व पर्यटन मंत्री मा.ना.गिरीश महाजन यांच्या मुंबईतील सेवासदन या निवासस्थानी भेट घेत रावेर विधानसभा क्षेत्रातील व तालुक्यातील नागरीकांशी निगडीत असलेल्या विविध समस्यांबाबत तसेच शहरी व ग्रामीण रस्त्यांच्या झालेल्या बिकट अवस्थेबाबत चर्चा केली.दरम्यान राज्याचे ग्रामविकास,पंचायतराज व पर्यटन मंत्री मा.ना.गिरीश महाजन यांनी डॉ.कुंदन फेगडे यांच्या चर्चेस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यावेळी ना.गिरीश महाजन यांच्याशी रावेर विधानसभा मतदार संघातील प्रामुख्याने यावल नगर परिषद क्षेत्रातील रस्त्यांची झालेली अवस्था व ग्रामीण परिसरातील जोडणाऱ्या रस्त्यांच्या समस्यांसह विविध नागरीकांच्या समस्याबाबत सविस्तर चर्चा याबाबत करण्यात आली.दरम्यान या संदर्भात आपण विशेष लक्ष देवुन या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य क्रमांकाने पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन ना.गिरीष महाजन यांनी डॉ.कुंदन फेगडे यांना दिले असल्याचे सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.