Just another WordPress site

तालुक्यातील गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमीत्ताने मिरवणुका शांततेत व उत्साहात पार पाडण्याचे शांतता समिती बैठकीत आवाहन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१० सप्टेंबर २४ मंगळवार

गणेशोत्सव विसर्जन व मुस्लीम बांधवांचा सण ईद-ए-मिलाद मिरवणूक संदर्भात येथील पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी आणि अडचणी संदर्भात आढावा याबाबत पोलीस ठाण्याचे आवारात नुकतीच शांतता समिती सदस्य व प्रतिष्ठितांची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली तसेच खेडेगावातील सण,उत्सव,मिरवणुका ह्या सर्व सर्वधर्मीय प्रतिष्ठीतांच्या समोपचारातून व्हाव्यात असे मत पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान शांतता समिती सदस्यांनी व प्रतिष्ठितांनी शहरातील शांतता कायम राखण्यासाठी युवा वर्गास समजावून अती उत्साहापासून रोखणे महत्त्वाचे असून शहरातील मोहल्या- मोहल्यात तरूण वर्गाच्या ही बैठका घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी यावेळी सांगितले.तसेच मिरवणुकीत ऐन वेळेवर एखाद्या विषयावर वाद होतात तेव्हा धावपळ होते असे होऊ नये म्हणून या बैठकीचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर कोणत्याही समाजाची धार्मिक मिरवणूक असो ती धार्मिक पध्दतीनेच व्हावी जो चुकतो त्याचे समर्थन न करता त्यास समजावून सांगितले पाहिजे कारण एकामुळे वातावरण दुषीत होते तर दोषींवर आम्ही कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी पारंपरिक गणपती,दुर्गा मिरवणूक मार्ग,सार्वजनिक ठिकाणी झेंडे,बॅनर लावण्यासंदर्भात तसेच नगरपालिकेच्या शहरातील समस्या बाबत अनास्था वर बैठकीत चांगलीच गरमा गरम चर्चा झाली तर अनेकांनी यावर खदखद व्यक्त करत यातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावर सर्व धर्मीयांनी एकत्रित बसून चर्चा घडवून त्यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले.प्रसंगी भगतसिंग पाटील,माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,पुंडलिक बारी,भाजपाचे माजी शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार,असलम खान,गोपालसींग पाटील, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन अमोल भिरूड यांचेसह सर्व धर्मीय सदस्यांनी चर्चेत सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.