यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :
दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार
राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या जिल्हा दौऱ्याअंतर्गत जनसंवाद मेळावा वैजापूर ता.चोपडा या ठिकाणी यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जनजमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी बांधवांचा जनसंवाद मेळावा नुकताच संपन्न झाला.सदर मेळाव्याच्या प्रसंगी राजीव सक्सेना निजी सचिव राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग,अंकितकुमार सेन अनुसंधान अधिकारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग,गोवर्धनजी मुंडे वरिष्ठ अन्वेषक राष्ट्रीय जनजाती आयोग,अमृतलाल प्रजापती सल्लाहाकार राष्ट्रीय जनजाती आयोग,जमीर शेख उप वनसंरक्षक वनविभाग यावल,वेवोतोल केजो सहाय्यक जिल्हाधिकारी जळगाव,अरुण पवार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल,प्रथमेश हडपे सब डीएफओ चोपडा यावल विभाग तसेच पंचायत समिती,महसूल विभाग, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सदर जनसंवाद मेळाव्यात आदिवासी बांधवांनी आपले प्रश्न आदिवासी जनजाती आयोग अध्यक्ष अंतरसिंग आर्य व समिती सदस्य यांच्यासमोर मांडले.प्रसंगी वनपट्टे धारकांच्या अडचणी,जातीचे दाखले काढण्यासंदर्भातील अडचणी,आरोग्य सुविधा,पेसा भरती संबंधित अडचणी तसेच आदिवासी भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही याविषयी अशा अनेक प्रश्न आदिवासी बांधवांनी जनसंवाद मेळाव्यात मांडले.तसेच आदिवासी जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांनी सर्व आदिवासी बांधवाच्या प्रश्न जाणून घेतले व प्रस्तावित वनपट्टे धारकांना नियमानुसार वनपट्टे मंजूर करणे,पेसा भरती संदर्भात राष्ट्रीय आदिवासी जनजाती आयोग पूर्णपणे तुमच्या सोबत आहे असे आश्वाशित केले तसेच आदिवासी क्षेत्रात मोबाईल नेटवर्क संदर्भात अधिकारी यांच्यासोबत मिटींग घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल तसेच अनेर नदीवर मध्यप्रदेश व महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर धरण बांधकाम प्रस्तावित असून यामुळे दोन्ही राज्यातील आदिवासी बांधवाचा शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले तसेच आदिवासी विकास विभाग व वनविभागाने फळ झाडे वृक्ष लागवड संदर्भात पुढाकार घ्यावा असे आदेशित केले.दरम्यान अंतरसिंग आर्य व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते एक पेड माॅ के नाम अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी राष्ट्रीय जनजाती आयोग अध्यक्ष अतंरसिंग आर्य व समिती सदस्य यांनी धरणगाव येथील क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले.
सदर कार्यक्रम प्रसंगी लोक संघर्ष मोर्चा अध्यक्ष प्रतिभा शिंदे,डॉ.चंद्रकांत बारेला,सिताराम पटेल सेंंधवा जनपद अध्यक्ष,वैजापूर सरपंच दत्तरसिंग पावरा,मेलाणे सरपंच प्रताप पावरा,देव्हारी सरपंच प्रल्हाद पाडवी,बोरअजंटी सरपंच धरमसिंग बारेला,कर्जाणे सरपंच सतिष बारेला,माजी उपसभापती ताराचंद पावरा,भुषण भिल,प्रमोद बारेला,दयाराम बारेला,ॲड.आरिफा तडवी,मुबारक तडवी,किशोर तडवी,संजय शिरसाठ,लुकमान तडवी तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आदिवासी समाज बांधव व पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सदस्य,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरील कार्यक्रमासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहूरे,पवन पाटील,सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील,सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी,वैजापूर वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल समाधान सोनवणे आदिनी परिश्रम घेतले.सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले.