चोपडा-तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार
तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आज दि.१४ सप्टेंबर शनिवार रोजी भाजपा अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर यांच्या वतीने पहिली ते चौथी पर्यंतच्या जवळजवळ १५० मुला-मुलींना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी भाजपा अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर,भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस व पोलीस नायक चोपडा तालुका प्रतिनिधी महेश रामराव बोरसे,सरपंच सचिन प्रल्हाद शिरसाट,महेश ज्ञानेश्वर पवार,सचिन जगदीश धनगर,विविध कधी सोसायटी चेअरमन विजय अमृत बोरसे,श्रीराम विठ्ठल बोरसे,शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र विश्वनाथ महाजन,उपशिक्षक पांडुरंग जुलाल महाजन,भूपेंद्र देवदास पाटील,गणेश लक्ष्मण सूर्यवंशी,लक्ष्मीकांत वासुदेव पाटील,सुचिता रामदास सैंदाणे व सर्व उपशिक्षक तसेच नागरिक दीपक कैलास,धनगर शिरसाट व मान्यवर उपस्थित होते.