Just another WordPress site

भाजपा अनुसुचित जमाती मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष मिना तडवी यांनी घेतली आयोगाचे राष्ट्रीय प्रमुख अंतरसिंह आर्य यांची भेट

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार

अनुसुचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य हे जनसंवाद दौऱ्यात दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता आज दि. १४ सप्टेंबर शनिवार रोजी राज्यातील आदिवासी समाज बांधवांचा विविध समस्या संदर्भात परसाडे येथील सरपंच व भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिना राजु तडवी यांनी आयोगाचे राष्ट्रीय प्रमुख अंतरसिंह आर्य यांची भेट घेत त्यांना आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

अनुसुचित जमातीच्या आयोगाचे राष्ट्रीय प्रमुख हे आपल्या दोन दिवसीय आदिवासी बांधवांच्या समस्या व मागण्यांच्या विषयाला जाणुन घेण्यासाठी जनसंवाद दौऱ्यावर आले असून भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचित मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मिना राजु तडवी यांनी आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह यांची जळगाव येथील अंजिठा विश्रामगृह येथे भेट घेवुन जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विविध अडचणी व समस्यांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करीत त्यांना निवेदन देवुन सादर करून माहिती दिली.याप्रसंगी मिना तडवी यांच्या सोबत हिंगोणा सरपंच रहीसा फिरोज तडवी,परसाडे ग्रामपंचायत सदस्य मदीना तडवी,रोशन तडवी,अखिल भारतीय विकास परिषदचे जिल्हा सरचिटणीस अनिस तडवी यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील आदिवासी तडवी भिल्ल महिला मंडळाचे पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.