या नेमणूक देण्यात येणाऱ्या कंत्राटी शिक्षकांना १५ हजार रुपये मानधन दिले जाणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ५ सप्टेंबर २०२४ रोजी शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा शासन निर्णय निर्गमित केला आहे.शिक्षक दिनाच्या दिवशी आदेश आल्यामुळे शिक्षक संघटनांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील संच मान्यतेनुसार ८४८ जिल्हा परिषद शाळांची संख्या वीस पट संख्येची आहे तर दहा पट संख्येची ५११ एवढी आहे.या शाळांची संख्या चालू वर्षाच्या संच मान्यतेनुसार वाढणार आहे त्यामुळे शाळा मधील एक पद कमी करून त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील २० पटसंख्या शाळा दोडामार्ग ६९,सावंतवाडी ११५,वेंगुर्ला ३०,कुडाळ ११९,मालवण १३९,कणकवली १२७,देवगड १३०,वैभववाडी ६९ म्हणून जिल्ह्यात ८४८ शाळा २० पट संख्येच्या आहेत तर दहा पटसंख्या च्या ५११ शाळा असून त्यांची तालुका निहाय संख्या अशी देवगड ७८, दोडामार्ग ३८,कणकवली ८३,कुडाळ ६७,मालवण ८७,सावंतवाडी ६१,वैभववाडी ५०,वेंगुर्ला ४७ आहे.आता मार्गदर्शक तत्त्वानुसार कारवाई शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० पेक्षा कमी पटसंख्याच्या शाळावर प्रत्येकी एक डीएड धारकांचा शिक्षक किंवा सेवानिवृत्त शिक्षक देण्यासंदर्भात शासन निर्णय झाला आहे परंतु सध्या कार्यरत शिक्षकापैकी त्या शिक्षकांना तेथून दुसऱ्या शाळेत पाठवायचे,एकापेक्षा अधिक अर्ज आल्यावर निवड कोणी कशा पद्धतीने करायची ? या संदर्भात शिक्षण संचालक कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना येतील त्यानुसार काही दिवसात कारवाई केली जाईल असे शिक्षक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.