मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार

मी मुख्यमंत्रिपदाची किंवा मंत्रिपदाची अपेक्षा सोडून दिली असून ज्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भाजपाचे १२३ आमदार निवडून आणून दाखवले होते त्यामुळे त्यावेळी माझा मुख्यमंत्रिपदासाठीचा पहिला दावा होता असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.तसेच आपल्याकडे एक सीडी होती असाही दावा एकनाथ खडसेंनी केला आहे.तसेच दोन नेत्यांना कंटाळून मी भाजपा सोडली.सध्या जे काही राजकारण चालले आहे त्या राजकारणात मला मुख्यमंत्रिपदही नकोच आहे असेही एकनाथ खडसे म्हणाले.सध्याच्या घडीला महाराष्ट्र घाणेरडे राजकारण अनुभवतो आहे.तसेच सध्या मुख्यमंत्री एका पक्षाचा होऊच शकत नाही अशी स्थिती आहे व अशा स्थितीत मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा मुळीच नाही असेही एकनाथ खडसेंनी सांगितले.दुसऱ्याला आवरता आवरता किती सावरावे लागत आहे.आपण पाहतोय मग ती लाडकी बहीण योजना असो किंवा इतर.निवडणूक आल्यावर कशी धावपळ होते ते सगळे बघत आहेतच असेही एकनाथ खडसे म्हणाले.एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे  यांनी हे वक्तव्य केले आहे.

काही एक-दोन व्यक्तींनी राजकारणाचा चिखल झाला आहे.मी नाव न घेता सांगेन की एका व्यक्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला.ते नाव मी घेण्याची गरज नाही ते कुणालाही विचारा माहीत आहे.सूडाचे राजकारण,फोडाफोडीचे राजकारण सगळे महाराष्ट्रात घडले आहे त्याला एक व्यक्ती जबाबदार आहे असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.ईडी,सीबीआय या यंत्रणांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. नीरव मोदीला का सोडले आहे ? माझ्या प्रकरणात माझा काय दोष आहे ? मला सांगा.मला अकारण यामध्ये गोवण्यात आले आहे असेही खडसे यांनी म्हटले आहे.“ईडी म्हणाले म्हणून मी सीडी म्हटले होते व यमक जुळवून मी बोललो.माझ्याकडे काही कागदपत्र आणि व्हिज्युअल्स होते. माझ्या मोबाइलमधला व्हिडीओ भाजपाच्या वरिष्ठांनाही दाखवला होता.बघा मुलीबरोबरचे चाळे.मी तो व्हिडीओ कुणाचा होता ते सांगणार नाही मात्र नंतर मलाच समजले नाही की मोबाइलमधून तो व्हिडीओ कसा डिलिट झाला.मी शपथेवर सांगतो मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो माझ्याकडे भाजपा नेता मुलीबरोबर चाळे करत होता हे व्हिज्युअल्स होते.मी ते भाजपाच्या वरिष्ठांना दाखवले होते.दिल्लीतल्या काही वरिष्ठांना दाखवले होते व त्यांनी ते पाहिले होते हे निश्चित.मला मोबाइल फार समजत नाही.१५ ते २० दिवस तो व्हिडीओ होता.मी पत्रकारांनाही दाखवले होते.मला थोडी भीतीही होती की याचा गैरवापर होईल.”असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.मी माझ्या पीएला सांगितले होते की दुसरा मोबाइल आण आणि त्यात ट्रान्सफर कर पण ते त्यावेळी काही झाले नाही पण ते होते हे निर्विवाद सत्य आहे दुर्दैवाने ते डिलिट झाले.तुम्हाला जी नावे माहीत आहेत त्यांच्यापैकीच हा एक भाजपाचा नेता आहे.ज्याने मला हा व्हिडीओ दिला होता त्याला मॅनेज करुन टाकले.त्याला एक फ्लॅट पाच ते दहा कोटी रुपये हे सगळे दिले.आता तो माणूस त्यांच्या बाजूने आहे.त्याची आता २५ कोटींची प्रॉपर्टी आहे.सगळ्यांना माहीत आहे तो माणूस कोण आहे.हातात पुरावा नाही त्यामुळे मला फार बोलता येत नाही.कुणाचे काय चारित्र्य आहे सगळ्यांना माहीत आहे.”असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.