यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील पुर्व वन विभागात मोठया प्रमाणावर वृक्षतोड करून वनसंपत्ती नष्ट करणारे तीन आरोपी अटकेत होते.सदरील आरोपी हे पोलीस ठाण्याच्या परिसरातुन फरार झाले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत मिळालेली माहीती अशी की,यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील वन विभागाच्या पुर्व पेझरपाळा या कंम्पाडमेंट क्रमांक ७९ व ८० मधील वनक्षेत्रात अवैधरित्या मोल्यवान वृक्षतोड करीत असल्याच्या कारणांवरून वन विभागाव्दारे करण्यात आलेल्या कार्यवाहीत अटकेत असलेले आरोपी बिलालसिंग पावरा,प्यारासिंग पावरा आणी सुरेश पावरा या तिन अटकेतील आरोपींंना दिनांक १२ ऑक्टोबर रोजी २२ रोजी भुसावळ न्यायालयात हजर करून पुनश्च त्यांना यावल येथील ग्रामीण रूग्णालयात सायंकाळी ७ ते ७-३० वाजेच्या सुमारास आरोपींची आरोग्य तपासणी करण्या करिता आणण्यात आले.तदनंतर कस्टडीतील आरोपींना अटकेची प्रक्रीया करीत असतांना या तीनही आरोपींनी पोलीस ठाण्याच्या आवारातुन पळ काढून पलायन करण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकारामुळे वनक्षेत्राच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.या संदर्भात यावल वन विभागातील पुर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी या बाबतच्या घटनेला दुजोरा दिला आहे.फरार झालेल्या तिनही आरोपींच्या शोधकामाकरिता वेगवेगळी पथक सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात रात्रीच पाठवण्यात आले आहे तसेच फरार झालेल्या तिन्ही आरोपी विरूद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लवकरच आरोपी शोधण्यात आम्हाला यश येईल असा विश्वास वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी व्यक्त केला आहे.