Just another WordPress site

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती नुतन सभापती राकेश फेगडेंचे भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळेंच्या हस्ते सत्कार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ सप्टेंबर २४ गुरुवार

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी पक्ष पक्षाच्या महायुतीचे राकेश वसंत फेगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन भारतीय जनता पक्ष पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात सहाय्यक निबंधक एफ.एस.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभापती निवडीच्या बैठकीत कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.दरम्यान निवड झाल्यावर नुतन सभापती राकेश फेगडे यांनी भालोद येथे जावुन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी राकेश फेगडे यांनी स्व.हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांना आदरांजली वाहिली.प्रसंगी अमोल जावळे यांच्या वतीने राकेश फेगडे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.यावेळी पक्षाचे युवा मोर्चाचे वेकंटेश बारी व भाजपा भालोद शाखा अध्यक्ष मिनल चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.