यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ सप्टेंबर २४ गुरुवार
तालुक्यातील साकळी गावापासून ते साकळी फाट्यापर्यंतच्या मार्गावरील रस्ता व गटारींची फारच दयनीय अवस्था झाली असून सदरील रस्ता व गटारी दुरुस्तीबाबत ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील साकळी गावाचा रस्ता हा १ कि मी गटारीसह रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे अंदाजित किंमत रक्कम रू २१६ (रु.दोन कोटी सोळा लाख लक्ष) मंजूर असून आमदार ताई यांच्या शुभहस्ते दि.२१ फेब्रुवारी २४ रोजी भूमिपूजन सुद्धा झाले आहे.तरी आज पावतो तो रस्ता व गटारी होताना दिसले नाहीत व आता पावसाळा सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे तरी गावातील नागरिकांना रस्ता हा दैननिय अवस्थेत दिसत आहे.परिणामी गावातील नागरिकांना या रस्त्याने जाताना खूप त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान अपघात सुद्धा झाले आहेत मात्र सदर रस्त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.तरी साकळी गावातून ते फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी गावकरी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून शासनाला करण्यात येत आहे व तसे न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे यांना निवेदन देतांना तालुका अध्यक्ष यावल मनसे मुकेश बोरसे यांच्यासह मनसेचे जनहित विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर, किशोर नन्नवरे,हर्षल बाविस्कर,गौरव कोळी,शाम पवार आदी कार्यकर्त या प्रसंगी उपस्थित होते.