यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ सप्टेंबर २४ गुरुवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे प्रकल्प कार्यालय यावल व तहसिल कार्यालय यावल यांच्या संयुक्त विद्यमाने जातीचे प्रमाणपत्र,अधिवास दाखल्यासाठी अर्ज स्विकृती व दाखले वाटप शिबीर आयोजन करण्यात आले.
यानिमित्ताने आज दि.१९ सप्टेंबर गुरुवार रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा डोंगरकठोरा येथे प्रकल्प कार्यालय यावल व तहसिल कार्यालय यावल यांच्या संयुक्त विद्यमाने जातीचे प्रमाणपत्र,अधिवास दाखल्यासाठी अर्ज स्विकृती व दाखले वाटप शिबीर घेण्यात आले.यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित विद्यार्थी व पालकांना विविध दाखल्यांचे अर्ज व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे तसेच आधार अद्ययावतीकरण व आई वडीलांचे छत्र हरपलेल्या बालकांसाठी संजय गांधी योजनेबाबत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी जातीच्या प्रमाणपत्राबाबतच्या विशेष मोहिमेबाबत अवगत करून सखोल मार्गदर्शन केले.यावेळी आदिवासी प्रकल्पाचे सहाय्यक जावेद तडवी,मुख्याध्यापक शिवहरी नारायण वानखेडे तसेच तलाठी डोंगर कठोरा गजानन पाटील उपस्थित होते.