Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे मधुस्नेह संस्था परिवारातर्फे यशवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२० सप्टेंबर २४ शुक्रवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आज दि.२० सप्टेंबर शुक्रवार रोजी मधुस्नेह संस्था परिवार खिरोदा यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत गुणवंत व यशवंत विद्यार्थी तसेच शिक्षकांचा सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीषदादा चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार झांबरे व संचालक मंडळ पदाधिकारी सरपंच नवाज तडवी,ग्रामपंचायत सदस्य आशा आढाळे,पोलीस पाटील राजरत्न आढाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नंदन वळींकर यांनी केले.प्रास्ताविकात प्रा.नंदन वळींकर यांनी अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या इवलुश्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत असल्याचे सांगतांना त्यांनी मंडळाने सहन केलेल्या अडचणीतुन केलेल्या वाटचालीची तसेच मधुस्नेह संस्था परिवार खिरोदा या संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.प्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर व गुणवंत विद्यार्थी तसेच अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व महिला विद्यालयातील शिक्षकांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सोनाली फेगडे यांनी केले तर आभार उपशिक्षक पी.पी. कुयटे यांनी मानले.

प्रसंगी अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार झांबरे यांनी आपल्या मनोगतात मधुकरराव चौधरी यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रात केलेल्या कार्याबाबत माहिती दिली.तर अध्यक्षीय भाषणात आमदार शिरीषदादा चौधरी यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेत त्या सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.तसेच भावी आयुष्य हे  शैक्षणिक व  समाजसेवा करण्यामध्ये घालविणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आई-वडील व शिक्षकांप्रती कृतज्ञ राहण्याचा मौलिक सल्ला यावेळी दिला.प्रसंगी संचालक डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,राजाराम राणे,शरद राणे,दिनकर पाटील,गोपाळ सरोदे,सुदाम राणे,चिंधू झांबरे,प्रमोद झांबरे,मधुकर चौधरी,मुख्याध्यापक नितीन झांबरे,उपशिक्षक एन.व्ही.वळींकार,पी.पी.कुयटे,आर.पी.चिमणकारे,श्रीमती मनीषा तडवी,एस.डी.भंगाळे,शुभांगीनी पाटील,आर.के.जानकर,व्ही.व्ही.कुलट,सोनाली फेगडे,सी.एन.चौधरी,प्राचार्य दिलीप भोळे,प्रा.डॉ.सुरेश ढाके,प्रा.डॉ.श्रीमती शकुंतला भारंबे,प्रा.डॉ.विनोद मोरे,प्रा.डॉ.रवींद्र खरे,विजय वाकेकर,कौस्तुभ पाटील,सचिन गुरव,अरविंद कुरकुरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.