Just another WordPress site

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने कॉम्रेड सीताराम येचुरी यांना आदरांजली

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक

रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) ;-

दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व पक्षाचे सर्वोच्च नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांना काल दि.२२ सप्टेंबर रविवार रोजी इंडिया आघाडी व महाविकास आघाडी यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.उरणच्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके सभागृहात आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी उरण आणि रयागडातील शेतकरी व जनतेसाठी केलेल्या कार्याबद्दल सभेत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तर सभेत अनेक वक्त्यांनी कॉम्रेड येचुरी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

या सभेच्या अध्यक्षस्थानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव कॉ.रामचंद्र म्हात्रे हे होते तर यावेळी माजी आमदार मनोहर भोईर,शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार प्रितम म्हात्रे,कामगार नेते कॉ.भूषण पाटील,काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील,उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील,मधुसूदन म्हात्रे,काका पाटील,सत्यवान ठाकूर,जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरो,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी आदरांजली वाहिली.यावेळी कॉम्रेड संजय ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले तर कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे समाजवादी समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडी यांची सत्ता केंद्र आणि राज्यात आणण्यासाठी एक होऊन लढण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच त्यांच्या महामुंबई सेझ,सेफ्टी झोन या उरणचे हे जनतेचे प्रश्न केंद्र सरकार कडे मांडण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.तर शेतकऱ्यांना २०१३ चा लाभदायक ठरणारा तसेच आदिवासीना हक्काने जमीनी देणारा वनहक्क कायदा देण्यासाठी डाव्या आघाडीच्या माध्यमातून केलेले प्रयत्न या संदर्भात ही जनतेच्या वतीने कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे आभार मानीत त्यांच्या साधी राहणी उच्च विचारसरणी,त्यांचा समाजाप्रती असलेला त्याग व आयुष्यभर समाजासाठी झिजूनही शेवटच्या क्षणीही आपला देह वैद्यकीय चिकित्सा करण्यासाठी देत समाजासाठी समर्पण करण्याचा एक आदर्श निर्माण केल्याचे ही वक्त्यानी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.