यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ सप्टेंबर २४ बुधवार
यावल तालुका व ईतर क्षेत्रासाठी लाभदायक ठरणारे तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत जळगाव,भुसावळ,यावल व चोपडा तालुक्यातील शेतकरी व भूमिपुत्र तसेच नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या शेळगाव बॅरेजचे शेतकऱ्यांसह जलपूजन भाजपाचे सक्रीय सदस्य डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.सदर बॅरेजमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला असून या कल्याणकारी व अमृतमय जलसाठ्याचे सर्वात प्रथमच शास्त्रोक्त पद्धतीने पूजन रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी,पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत लोकप्रिय समाजसेवक डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी केले.
शेळगाव बॅरेज सिंचन योजनेंतर्गत यावल व चोपडा तालुक्यातील साकळी,नावरे,विरावली,मेहेलखेडी,कोरपावली,दहिगाव,वाघोदा,चुंचाळे, गिरडगाव,वढोदे,दगडी,बोराडे,शिरसाठ यातील ४ हजार ६९९.१३ हेक्टर जमीन तसेच रावेर विधानसभा मतदारसंघातील यावल,सांगवी बु., चितोडा,अट्रावल,सातोद,कोळवद या ६ गावांमधील ४ हजार ४२८.९ हेक्टर जमीन अशी एकूण ९ हजार १२८ हेक्टर जमीन लाभान्वित होणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या २०१८-१९ बेंचमार्किंग रिपोर्टनुसार शेतकर्यांना सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.या प्रकल्पामुळे पाणलोटांची भूजल पातळीत वाढ होणे व यावल-रावेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असून मोठ्या प्रमाणावर भूजल पुनर्भरण,भूजल व्यवस्थापन केल्यास भूजल पातळीत वाढ होणार आहे.जळगाव,भुसावळ,यावल,चोपडा तालुक्यातील क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या प्रकल्पासाठी माजी खासदार तथा आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांच्यासह आमदार लताताई सोनवणे यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून पूर्णत्वास आणले.रावेर विधानसभा मतदारसंघातील ६ गावे हे सिंचन व औद्योगिक वापरासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याने शेतकरी भूमिपुत्र व नागरिकांच्या सर्वतोपरी कल्याणासाठी,कायापालटासाठी,जलदेवतेची कृपा राहणेसाठी रावेर विधानसभा मतदारसंघातील आणि यावल येथील समाजसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी प्रथमच शास्रोक्त पद्धतीने शेळगाव बॅरेज प्रकल्पातील जलपूजन केले.यावेळी भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली यात गोपाळसिंग पाटील,उखर्डू पाटील,हेमराज फेगडे,योगेश चौधरी,अनुराधा परदेशी,रोहिदास सपकाळे,गोपाळ कोळी,अनिल सपकाळे,मोहन सपकाळे,सतिष कोळी,गजानन कोळी,संजय पाटील,नाना कोळी,पुष्पक कोळी,गणेश कोळी,अजय कोळी,रितेश बारी,निलेश सपकाळे,अक्षय पवार,राहुल झांबरे,उज्वल कानडे,कोमल इंगळे,शुभम देशमुख,मनोज बारी यांच्यासह मोठ्या संख्येने युवक नागरिक व सहकारी उपस्थित होते.