यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ सप्टेंबर २४ गुरुवार
येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज दि.२६ सप्टेंबर गुरुवार रोजी शाळेत मधुस्नेह संस्था परिवारातर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधत यशवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आला.
दरम्यान स्कुल आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार शिरिष चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड,यावल शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष कदीर खान,जिल्हा परिषदचे माजी विरोधी पक्ष गटनेते प्रभाकर सोनवणे उपस्थित होते.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार मा.शिरिषदादा चौधरी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.यावेळी अध्यक्षांच्या वतीने शाळेतील इयत्ता १० वीतील गुणवंत विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षकांचा अध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला.सदरहू रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरिष मधुकरराव चौधरी यांनी हा सोहळा आयोजित करून तालुक्या तील प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम केले असल्याची भावना उपस्थितांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.प्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शैक्षणिक विषयावर योग्य असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र महाजन व संस्थेचे संचालक शशीकांत फेगडे व शिक्षक गोपाळ महाजन तसेच मुख्याध्यापिका शीला तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना चौधरी यांनी केले.या कार्यक्रमास प्रशांत फेगडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.