विठ्ठल ममताबादे-पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार
आज दि.२८ सप्टेंबर २४ रोजी आगरी शिक्षण संस्था,सेक्टर ६,प्लॉट नं.१२,खांदा कॉलनी,नवीन पनवेल येथे सकाळी १ ते सायंकाळी ५ या वेळेत दिवगंत कामगार नेते शाम म्हात्रे साहेबाच्या जयंतीच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,वत्कृत्व स्पर्धा,पाककला स्पर्धा, एकपात्री आणि व्दिपात्री अभिनय स्पर्धा,काव्यलेखन स्पर्धा अशा प्रकारे दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या सर्वच स्पर्धाना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन एकता कॅटलिस्टच्या अध्यक्षा व कामगार नेत्या डॉ.श्रुती शाम म्हात्रे,श्रीमती शशिकला सिंग माजी नगरसेविका व काँग्रेस नेत्या,आगरी शिक्षण संस्थचे प्रिंन्सीपल पंकज भगत,प्राथमिक शाळेच्या श्रीमती मनिषा तांडेल,तरंग माने यांच्या हस्ते करण्यात आले. आलेल्या प्रमुख पाहुण्याचे स्वागत श्रीमती मनिषा तांडेल यांच्या हस्ते एकता कॅटलिस्टच्या अध्यक्षा व कामगारनेत्या डॉ.श्रुती शाम म्हात्रे,श्रीमती शशिकला सिंग यांना पुष्पगुच्छ व शाल देवून करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर उपस्थित प्रिंन्सीपल पंकज भगत,जेएनपीटी नेते दिपक म्हात्रे, कोकण श्रमिक संघ एचआयएल नेते आर डी पाटील,कोंकण श्रमिक संघचे खजिनदार एकनाथ ठोंबरे,तरंग माने,अजित म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती शशिकला सिंग यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून खूप मोठे व्हावे.तुमच्यापैकी कोणी शिक्षक,डॉक्टर बनावे व देशाचे नाव उज्वल करावे असे मार्गदर्शन केले.पंकज भगत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना दिवगंत श्री. शाम म्हात्रे साहेब यांचे आगरी शाळेवर विशेष प्रेम होते तसेच शाळेच्या व संस्थेच्या उभारणीत त्याचा सिंहाचा वाटा आहे असे सांगितले.एकता कॅटलिस्ट अध्यक्षा व कार्यक्रमाच्या आयोजक डॉ. श्रुती म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी सर्वगुण संपन्न व्हायला पाहिजे असे सांगितले.पुस्तकी अभ्यासाबरोबर इतर गुण देखील विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला पाहिजेत यासाठी आज चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा,वत्कृत्व स्पर्धा,पाककला स्पर्धा,एकपात्री आणि व्दिपात्री अभिनय स्पर्धा,काव्यलेखन स्पर्धा या स्पर्धा आयोजित करण्याचा हेतू आहे असे सांगितले.दिवगंत शाम म्हात्रे साहेब यांचे आगरी शाळेवर विशेष प्रेम होते.त्यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी मोठा उत्सव असायचा यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आले आहेत असेही श्रुती म्हात्रे यांनी सांगितले.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनिषा तांडेल यांनी उपस्थित एकता कॅटलिस्टच्या अध्यक्षा डॉ.श्रुती म्हात्रे,श्रीमती शशिकला सिंग,पंकज भगत,एकनाथ ठोंबरे व शिक्षक स्पर्धेसाठी आलेले विविध शाळेतील विद्याथी व शिक्षक या सर्वाचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहिर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश नाईक सर यांनी केले.स्पर्धा परिक्षाचे बक्षीस समारंभ रविवार दि.६ ऑक्टोबर २४ रोजी वासुदेव बळवंत फडके नाटयगृह पनवेल येथे १० ते २ या वेळेत होईल.दि. ५ तारखेपर्यंत आलेल्या स्पर्धकांचे लेखन साहित्य स्विकारले जाईल असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.