मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तुम्हाला भाजपसोबत जायचेच होते मग उगीच हिंदुत्व अन निधीची कारणे सांगत बसलात.अनैसर्गिक युती होती असे म्हणता मग ज्यांच्याबरोबर गेलात त्यांनी अजितदादांबरोबर पहाटेचा शपथविधी केलाच होतात की?राहिला प्रश्न निधीचा ?मग अजितदादा ज्यावेळी विधान भवनात दिलेल्या निधीची यादी वाचत होते त्यावेळी शिंदेंच्या गटातील आमदार का शांत होते?त्यांनी अजितदादांचे म्हणणे का खोडून काढले नाही?म्हणून खोटे आरोप करुन माझ्या पक्षनेतृत्वाकडे फक्त बोट करुन दाखवा व्याजासकट नाही चक्रवाढ व्याजासकट हिशेब चुकता करेन !असा इशाराच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांना दिला आहे.संघर्षातून जात असलेल्या शिवसेनेने कात टाकण्यासाठी महाप्रबोधन यात्रेची आखणी केली आहे.चार दिवसांपूर्वी ठाण्यात दणदणीत पार पडलेल्या सभेनंतर नुकतीच ठाकरे गटाची सभा नवी मुंबईत संपन्न झाली.नवी मुंबईच्या शिवसैनिकांनी महाप्रबोधन यात्रेच्या सभेला तुफान गर्दी केली.’शिवतीर्थ’ गाजवलेल्या सुषमा अंधारे यांच्या आजच्या भाषणालाही उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.गद्दार आमदारांनी काहीबाही कारणे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला व उद्धव ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.पण माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर शिंदे गटातील आमदारांकडे नाहीय म्हणून मला त्यांना सांगायचेय की,आता जर बदनामी कराल व काहीबाही विषयांवरुन उद्धव ठाकरेंकडे बोट कराल तर व्याजासकट नाही चक्रवाढ व्याजासकट हिशेब चुकता करेल”,असा इशाराच त्यांनी शिंदे गटातील आमदारांना दिला आहे.
सुषमा अंधारे यांच्या उत्तराने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट
“शिंदे गटातील लोक म्हणतायेत की तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे आम्हाला निष्ठा आणि हिंदुत्व शिकवणार का?मला त्यांना सांगायचेय की,भलेही मी आधी शिवसेनेत नसेल पण संकटकाळात मी शिवसेनेत आले.तुम्ही ३० वर्ष सत्ता भोगली आमदार-खासदार झाले पण अडचणीच्या काळात सोडून गेले उद्धव ठाकरे संकटात असताना मी तुमच्यासारखी पळून गेली नाही अन मी निष्ठा शिकवली तर बिघडले कुठे?कधी कधी आजोबाला नात शिकवत असते !” असेही सुषमा अंधारे म्हणताच उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार असे म्हणणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांचा अंधारेंनी यावेळी खास स्टाईलमध्ये समाचार घेतला.गणेश नाईक-बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगत त्यांनी शिंदे गटातील नेत्यांचा समाचार घेतला.त्या म्हणाल्या,”गणेश नाईक शिवसेनेत होते ते अवैध पद्धतीने खाणी कोरत आहेत हे जेव्हा बाळासाहेबांना कळले तेव्हा त्यांनी गणेश नाईकांना खडसावले.पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे यासाठी त्यांनी गणेश नाईकांची कानउघडणी करत अवैध पद्धतीने खाणी कोरणे बंद करा असा दमच दिला.आताही आदित्य ठाकरे जेव्हा आरेच्या आंदोलनात अग्रणी होते तेव्हा ते एकप्रकारे बाळासाहेबांचा विचारच पुढे नेत होते हे तरी शिंदे गटातील लोकांना कळलंय का…? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील विरोधकांना केला आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.