यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ सप्टेंबर २४ रविवार
तालुक्यातील मनवेल येथे भंडाऱ्याच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर नंतर मनवेलपासुन जवळच असलेल्या शिरागड गावात हाणामारीत झाले.यात एका २२ वर्षीय तरुणावर तिघांनी प्राणाघातक हल्ला केला व त्याच्या पाठीवर आणी कमरेवर धारदार वस्तूने वार करून त्याला जबर दुखापत केली.सदरची घटना दि.२५ सप्टेंबर रोजी रात्री घडली होती तेव्हा यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व यातील एकाला अटक करण्यात आली आहे.
शिरागड तालुका यावल येथील रहिवासी गणेश राजू सोळुंके वय २२ वर्ष हा तरुण मनवेल ता.यावल या गावात भंडाऱ्याच्या कार्यक्रमात गेला होता.तेथे नाचण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर शिरागड गावात हाणामारीत घडले.शिरागड गावात गणेश सोळुंके याला ताराचंद व्यंकट सोळंके,कैलास व्यंकट सोळंके व प्रशांत कैलास सोळंके या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण करीत त्याच्या पाठीला व कमरेला धारदार वस्तूने वार करीत जबर दुखापत केली.या तरुणाला जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे.तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून यातील ताराचंद सोळंके याला पोलिसांनी अटक केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.