Just another WordPress site

पुण्यात टोमॅटोने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 3 महिला ठार तर ६ महिला गंभीर जखमी

पुणे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पुण्यातील खडकवासला धरण कालव्याच्या बत्तीस फाट्यामध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन महिला ठार तर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.सदरील अपघात दि.१३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराला घडली.जखमींना दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि,दि.१३ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना खडकवासला धरण कालव्याच्या बत्तीस फाट्यामध्ये ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या महिला या ट्रॉलीखाली सापडल्या व त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.टोमॅटो घेऊन हा ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना खडकवासला कालव्याच्या ३२ व्या क्रमांकाच्या वितरीकेवरून निघाला होता यावेळी चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला.यामध्ये रावणगाव परिसरातील बंगाल वस्तीवरील नऊ महिला होत्या.उपचारादरम्यान यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला तर बाकी महिला गंभीर जखमी आहेत.सुरेखा बाळू पानसरे,रेश्मा भाऊसाहेब पानसरे,अश्विनी प्रमोद आटोळे असे या अपघातात मृत पावलेल्या महिलांची नावे आहेत.तर इंदुबाई बाबासाहेब आटोळे,मीना बापू आटोळे,अनिता धनाजी साळुंखे,आक्का सुदाम साके,कावेरी माणिक आटोळे, उषा राजेंद्र आटोळे या  सहा महिला अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.या सर्व महिला एकाच वस्तीवरील असल्याने या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या ट्रॅक्टरमध्ये टोमॅटोने भरलेले ७० ते ८० कॅरेट होते.शेतातील टोमॅटोची तोडणी करुन ते घेऊन हा टॅक्टर निघाला होता.या ट्रॅक्टरमध्ये असलेल्या कॅरेटवर बसून ९ महिला निघाल्या होत्या.पण या ट्रॅक्टरला शेतातून बाहेर काढत असतानाच अपघात झाला.ट्रॅक्टर कालव्यामध्ये पलटी होऊन टोमॅटोचे कॅरेट महिलांच्या अंगावर पडले आणि त्या गंभीर जखमी झाल्या.या अपघातामध्ये तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर सहा महिला गंभीर जखमी झाल्या.या अपघातामध्ये सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊसाहेब पानसरे या दोन्ही सख्ख्या जावा आणि अश्विनी प्रमोद आटोळे या तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या सर्व महिला रावणगाव परिसरामध्येच राहणाऱ्या होत्या.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व ट्रॅक्टरमधून महिलांच्या अंगावर पडलेले टोमॅटोचे कॅरेट त्यांनी बाजूला करुन जखमी झालेल्या महिलांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.या महिलांवर दौड आणि भिगवण येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.या अपघाताचा तपास दौंड पोलिसांकडून सुरु असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.