यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० सप्टेंबर २४ सोमवार
नागरीकांच्या हितासाठी अग्रभागी राहणाऱ्या आश्रय फाउंडेशन या समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या प्रयत्नाला यश आले असुन यानिमित्ताने यावल नगर परिषदच्या वतीने साथी रोग आजाराच्या पार्श्वभुमीवर शहरातील विविध ठिकाणी जंतु किटनाशक धुर फवारणी करण्यात येत आहे.
दरम्यान राज्यात मागील काही दिवसांपासुन मलेरिया डेंगुची साथ मोठया वेगाने पसरत असल्याने यावल शहरवासीयांचे आरोग्य अबाधित राहावे व त्यांच्या आरोग्यास धोका उद्भवू नये याकरिता येथील विविध समाजीक कार्यात अग्रेसर असलेले यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख सत्यम पाटील यांच्याशी तात्काळ संपर्क साधुन त्यांना वेगाने पसरत असलेल्या डेंगू मलेरिया आजाराच्या साथीबाबतची जाणीव करून देत नगर परिषद प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणुन तात्काळ शहरात जंतुनाशक धूर फवारणी करावी अशी मागणी केली होती.सदरहू त्यांच्या मागणीला यश आले असून दरम्यान मागील चार ते पाच दिवसांपासून शहरासह परिसरात परतीच्या पाऊसाने दमदार हजेरी लावल्याने सदरच्या धुर फवारणीस थांबविण्यात आले होते.मात्र आता पाऊस थांबल्यामुळे शहरातील विस्तारित वसाहतीतील फालकनगर,आयशानगर,गंगानगर आदि परिसरात आरोग्य अधिकारी सत्यम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदचे कर्मचारी हे धुरफवारणी करीत असल्याचे दिसुन येत आहे.