यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार
येथील शहरातुन जाणारा बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर हा अत्यंत वर्दळीच्या प्रमुख राज्य महामार्गावरील भुसावळ पाँईट ते बुरूज चौकापर्यतच्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठी खड्डे पडल्याने हा रस्ता खड्डेमय झाला आहे.सदरचा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना यांनी वेळोवेळी निवेदन दिले असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.सदरहू या मार्गावरील रस्त्यावर वाहन चालवितांना खुड्डा चुकवितांना अंदाज चुकत असल्याने अनेक अपघात घडले असुन देखील संबधीत विभागाचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर यावल येथील शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा उपसंघटक नितिन सोनार व त्यांच्या सहकारी मित्रमंडळींनी स्वखर्चाने श्रमदानातुन बुरूज चौकापासुन भुसावळ टी पाँईट पर्यंत पडलेले मोठमोठी खड्डे कच्च टाकुन बुजले.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नितिन सोनार,अतुल बडगुजर,रामभाऊ सोनवणे,दिनकर क्षिरसागर,याकुब शेख,अश्पाक अली सैय्यद आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी या श्रमदानात सहभाग घेतला.नितिन सोनार व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदानातुन बूजलेले खड्डे बुजण्याचे कार्य केल्याने वाहनधारकांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला असुन नितिन सोनार व त्यांच्या मित्रमंडळीने श्रमदानातुन केलेल्या कार्याचे वाहन धारकांकडून विशेष कौत्तुक केले जात आहे.दरम्यान बुऱ्हाणपुर अंकलेश्वर महामार्गाशी संबधीत अधिकारी यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे पाहून दुर्लक्ष न करता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे.