Just another WordPress site

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये-अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची निवेदनाव्दारे मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार

येथील तहसील कार्यालयामध्ये काल सोमवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली यावल शाखेकडून निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनात धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश न करण्याची मागणी केली आहे तसेच प्रलंबीत आदिवासी पेसा क्षेत्रातील नोकर भरती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे.

यावल येथील तहसील कार्यालयामध्ये सोमवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा यावलचे अजहर तडवी,काँग्रेस अनुसूचित जमाती तालुका अध्यक्ष बशीर परमान तडवी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात म्हटले आहे की,धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार मूळ आदिवासींची १२ हजार ५०० पदे जे सध्या रिक्त आहे ती पद भरती तातडीने करावी यासह विविध मागण्या त्यांनी निवेदनातुन केल्या आहे.सदर निवेदन संगयोचे नायब तहसीलदार मनोज खारे यांच्याकडे देण्यात आले.यावेळी निवासी नायब तहसीलदार गांगुर्डे संगोयोचे सकावत तडवी,अखिल आदीवासी विकास परिषद संघटनेचे शरीफ तडवी,बशीर तडवी,जवानसिंग पावरा,शरीफ तडवी,सुभाष बारेला,बिसा तडवी,लुकमान तडवी यांच्यासह कोरपावली सरपंच विलास अडकमोल व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.