Just another WordPress site

यावल येथील प्रगतशील शेतकरी किशोर राणे कृषीभुषण पुरस्काराने सन्मानित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०२ ऑक्टोबर २४ बुधवार

येथील युवा प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते किशोर देवराम राणे यांना राजनंदीनी बहूऊद्देशीय संस्था,जळगावच्या वतीने दिला जाणाऱ्या कृषी भुषण या राज्यस्तारिय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

यावल नगर परिषदचे सतत सहा वेळा नगरसेवक पदावर राहीलेले जेष्ठ समाजसेवक व प्रगतीशील शेतकरी देवराम कृष्णा राणे यांचे चिरंजिव व आपल्या कृषीप्रधान संस्कृती जोपासुन शेतीत नाविन्यपुर्ण प्रयोग करीत विक्रमी उत्पादन तसेच केळी निर्यातमध्ये अग्रभागी राहणारे युवा शेतकरी किशोर देवराम राणे यांना जळगाव येथील राजनंदीनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरिय कृषिभुषण सन २०२३- २४ या पुरस्काराने जळगाव येथे अल्पबचत भवनात संस्थेच्या विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झालेल्या पुरस्कार सत्कार सोहळ्यात सपत्नीक नुकतेच सन्मानित करण्यात आले.किशोर राणे यांना राज्यस्तरिय कृषिभुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,हेमराज फेगडे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे स्वागत करीत अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.