Just another WordPress site

हरिपुरा आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताहानिमित्ताने मानव व वन्यजीव संघर्ष निवारण कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०४ ऑक्टोबर २४ शुक्रवार

तालुक्यातील हरिपूरा आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताह २०२४ च्या निमित्ताने “मानव- वन्यजीव संघर्ष निवारण” तसेच “वने व वन्यजीव” याबाबत यावल पश्चिम रेंज व यावल वन विभाग यावल,जळगाव तसेच वाईल्ड ल्यॅंड्स कंझर्वेशन फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच जन जागृती सभा घेण्यात आली.यामध्ये यावल पश्चिम वन परिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे यांनी कर्तव्य व जंगलाचे रक्षण करताना आलेले अनुभव सांगितले तसेच वाघ व कॅमेरा ट्रॅपची माहिती दिली.यावेळेस वाईल्ड ल्यॅंड्स कंझर्वेशन फाऊंडेशनचे संस्थापक अजिंक्य भांबुरकर यांनी वन्यजीव सप्ताह कधी सुरू करण्यात आला व त्याचे उद्देश कायव मानव-वन्यजीव संघर्ष म्हणजे काय ?,गाव व जंगलची भौगोलिक स्थिती कशी आहे ? जंगल कस कमी होत चालले आहे ? आपण जंगलावर कसे निरभर आहोत ? वाघ-बिबट च्या हालचाली व सवई काय आहेत ? कुठल्या स्थिती मध्ये वाघ-बिबट मानवावर हल्ला करतो व मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये यासाठी चे उपाय सांगण्यात आले.

दरम्यान नाले,पाणवठे,ठंडावाच्या ठिकाणी जाण्यास टाळावे,ज्या ठिकाणी वाघ-बिबट चे ठसे आढले त्या ठिकाणी जाण्यास टाळावे,अचानक पणे वाघ-बिबटसमोर आल्यास त्याकडे पाठ न करता हळूहळू मागे सरकून सुरक्षित अंतर ठेवावे.वाघ-बिबट शेतात गाव परिसरात आढळून आल्यास त्याचा पाठलाग करू नका व घेरू नका,आज जर मानव-वन्यजीव संघर्ष टाळायचा असेल तर विद्यार्थी,शिक्षक व स्थानिक लोकांचा सहभाग अत्यावश्यक आहे व सहजीवन अवलंबले तर हा संघर्ष सहज टाळता येईल.वरील वन्यजीव सप्ताह २०२४ जनजागृतीचा कार्यक्रम जमिर शेख (भा.व.से) उपवनसंरक्षक,यावल वन विभाग,जळगाव,समाधान पाटील (मा.व.से) सहाय्यक वनसंरक्षक,यावल वन विभाग, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.प्रसंगी आश्रमशाळा मुख्याध्यापक साईदाथ पवार,वर्ग शिक्षक व विद्यार्थी,वनपाल हरीपुरा संजय इंडे, वनपाल जामन्या दिपक परदेशी,वनरक्षक अशरफ तडवी,सुधीर पटणे,योगेश सोनवणे,अक्षय रोकडे,योगेश मुंडे,रवीकांत नगराळे,दिपक चव्हाण,विलास तडवी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.