यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
दि.०४ ऑक्टोबर २४ शुक्रवार
शहरात सालाबादप्रमाणे महर्षी व्यास यांच्या मंदिरासमोरील हरिता सरीता नदीच्या पात्रात होणाऱ्या दि.१२ ऑक्टोबर २४ शनिवार रोजी विजयादशमी (दसरा) च्या निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित होत असलेल्या रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नुकतीच सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली.
सदरील समितीच्या अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे तालुका यावल अध्यक्ष प्रा.मुकेश येवले उपाध्यक्षपदी यावल खरेदी विक्री सहकारी संघाचे माजी चेअरमन अमोल भिरुड,डॉ हेमंत येवले,कार्याध्यक्ष अमोल दुसाने,कोषाध्यक्ष विवेक देवरे यांची निवड करण्यात आली असुन समितीच्या कार्यकारणी सदस्य उमेश फेगडे,शरद कोळी,तुकाराम बारी,अभिमन्यु चौधरी,चेतन अढळकर,संतोष कवडीवाले,अरुण लोखंडे,सुनील गावडे,कामराज घारू,यशवंत जासुद,नितीन पाटील,दीपक जोशी,योगेश चौधरी,राजेश श्रावगी अशी सर्वपक्षीय व सर्व सामाजिक कार्यकारणी गठीत करण्यात आली.